गर्भवती स्त्रियांना महत्त्वाचे मार्गदर्शन | Pregnancy Tips In Marathi

Pregnancy Tips for first time Moms | गर्भवती स्त्रियांना महत्त्वाचे मार्गदर्शन

तुम्ही गर्भवती आहात. तुमचे मनःपूर्वक अभिनंदन ! गर्भधारणा ही स्त्रीच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वपूर्ण व आनंददायी घटना आहे. तसेच या काळात तुमच्या शरीरात अनेक बदल घडणार आहेत. त्याविषयी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.

Pregnancy Tips

Pregnancy confirm | गर्भधारणेची खात्री

तुमची पाळी चुकल्यानंतर साधारण ८ दिवसांनी सकाळची लघवी तपासून गर्भधारणेचे निदान करता येते. मात्र सोनोग्राफीच्या सहाय्याने पाळी चुकल्यानंतर ४/५ दिवसांनतर गर्भधारणेचे निश्चित निदान करता येते.

1 To 3 Month Pregnancy diet chart | पहिल्या महिन्यातील तक्रारी घ्यायची काळजी

गर्भधारणेनंतर शरीरात होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलामुळे उलट्या होणे किंवा मळमळ होणे हा त्रास होतो. विशेषत: सकाळी उठल्यानंतर हा त्रास जास्त प्रमाणात आढळतो म्हणून याला मॉर्निंग सिकनेस असेही म्हणतात. हा त्रास कमी करण्यासाठी खालील मुद्दे लक्षात ठेवा

१. तेलकट व तिखट खाणे शक्यतो कमी करा किंवा बंद करा. त्यामुळे पित्त कमी होण्यास मदत होते. काही स्त्रियांना स्वयंपाक करताना फोडणीच्या वासाने पित्त व मळमळ वाढते. त्यांनी फोडणी घालण्याचे काम टाळावे.

२. ३ ते ४ तासांनी थोडे थोडे अन्न खा.

सकाळी नाश्ता, दुपारी १२ ते १ वाजता जेवण, ५ वाजता अल्पोपहार, रात्री ९ वाजता जेवण अशी आहाराची विभागणी करा.

३. उपाशी राहणे टाळा. उपवास शक्यतो टाळा किंवा उपवासाचे पदार्थ वेळोवेळी खाऊन उपवास करा.

४. दूध व दुधाचे पदार्थ जास्त प्रमाणात घ्या. विशेषत: दूध भाकरी, दूध पोळी खाणे चांगले. दूध आवडत नसल्यास त्यात कॉफी, वेलदोडा इ. घालून घ्या किंवा दही, ताक घेतले तरी चालेल.

५. सर्व प्रकारची फळे खा. कोणतेही फळ चांगले. केळ किंवा पपई खाण्यास कोणतीही हरकत नाही.

६. जेवल्याबरोबर झोपणे टाळा. जेवणानंतर शतपावली फायदेशीर ठरेल.. ७. बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ नये म्हणून भरपूर पाणी पालेभाजी कोशिंबीर व फळे भरपूर घ्या. रोज १० ते १५ ग्लास पाणी प्या.

८. पहिले तीन महिने वारंवार लघवीला जावेसे वाटणे नैसर्गिक आहे. त्याला आजार समजू नका. ९. दिवसातून २ वेळा दात पेस्ट-ब्रशने घासावेत. सकाळी मळमळ किंवा उलटी होत असल्यास, दात न घासता चहा कॉफी ऐवजी टोस्ट, बिस्किट, ब्रेड किंवा भाकरी असे कोरडे पदार्थ खा. जरा वेळाने दूध घ्या. उशीरा दात घासा.

१०. मिश्री पूर्ण बंद करा. कोणत्याही मार्गाने तंबाखूचे सेवन टाळा.

Pregnancy Diet Chart | गर्भारपणातील आहार

१. रोज अर्धा लिटर दूध घेणे आवश्यक आहे. कॅल्शियम हे दुधाखेरीज नाचणी तीळ, मनुका, खारीक व पालेभाज्या तसेच सिताफळ, कडधान्ये आणि डाळीतून मिळते.

२. प्रथिने आहारात असणे अत्यावश्यक गोष्ट आहे. मांसाहार प्रथिनांचे दृष्टीने चांगला पण त्याचा अतिरेक नको. अंडी कच्ची खाऊ नयेत; उकडून किंवा आम्लेट चालेल. शाकाहारी स्त्री ही दूध, डाळी, उसळी यातून प्रथिने घेऊ शकते. एकातरी जेवणात मोडाची उसळ खाणे आवश्यक आहे.

३. भाजी भरपूर खावी. एका जेवणात फळभाजी घेतल्यास दुसऱ्यावेळी पालेभाजी खावी.

४. प्रत्येक जेवणात कच्च्या भाज्या ह्या कोशिंबिर किंवा सॅलडस् रूपाने घ्याव्यात.

५. जेवणात एक लिंबाची फोड घेणे जरूरीचे आहे.

६. उकळून गार केलेले पाणी पिणे सर्वात उत्तम.

७. कितीही संतुलित आहार घेतला तरी गर्भारपणातील लोह व कॅल्शियमची गरज भागत नाही. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घेणे आवश्यक आहे. डॉक्टर उगाचच गोळ्या देतात, त्याने बाळ जास्त वाढून सिझेरिअन करावे लागते ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे. तुमच्या शरीरातून बाळाला दिले गेलेले लोह व कॅल्शियम भरून काढण्यास गोळ्यांची मदत होते.

८. मद्यपान, धूम्रपान पूर्ण वर्ज्य.

अस्वच्छ पाणी पिणे टाळा. तसेच उघड्यावरील व रस्त्यातील, गाड्यावरील अन्न खाणे टाळा. अन्नावर माशा बसू देऊ नका. सर्व अन्न व्यवस्थित झाकून ठेवा. शिळे अन्न खाणे टाळा. फार तिखट व तळलेले पदार्थ खाणे टाळा कच्चे पदार्थ (उदा. फळे, काकडी, टोमॅटो इ. सॅलडस्) खाण्यापूर्वी स्वच्छ धुण्याची सवय लावून घ्या.

Pregnancy Exercise | गर्भारपणातील व्यायाम – Pregnancy Tips

या काळात आहाराइतकेच व्यायामालाही महत्त्व आहे. मात्र व्यायामाचा अतिरेकही नको. खूप दमणूक करणारे व्यायाम टाळणे चांगले. चालण्याचा व्यायाम सगळ्यात उत्तम. सर्वसाधारणतः रोज ४ ते ६ फर्लांग चालणे अतिशय फायदेशीर आहे. उंच टाचेच्या चपला, सॅण्डल्स घालणे टाळा, वाकून चालू नका. पोहणे, घोड्यावर बसणे, दोरीवरच्या उड्या असे प्रकार पूर्णपणे बंद करावेत. काही ठराविक योगासने अतिशय फायदेशीर ठरतात. त्यांनी प्रसूती सुलभ व नैसर्गिकरीत्या होण्यासही मदत होते. थोडी कंबरदुखी गर्भारपणात असणारच परंतु बसताना व्यवस्थित टेकून बसावे व झोपताना पाठीचा आधार व्यवस्थित आहे ना, हे पहावे.

Pregnancy Yoga | गर्भारपणातील करायची योगासने

योगासनांच्या माध्यमातून मिळणारा सौम्य हलकासा स्नायूचा ताण, श्वसनाचा व्यायाम, विशेषतः दीर्घश्वसन व शिथिलीकरण हे सुलभ प्रसूतीसाठी व उत्तम आरोग्यासाठी बहुमोल मदत करतात.

योगासनांच्या सहाय्याने कमरेच्या स्नायूंना ढिले सोडण्यास शिकल्यास नैसर्गिक प्रसूतीला खूप सहाय्य होते.

बद्धकोनासन, सुप्त वज्रासन यासारखी आसने मान, पाठीचा कणा व पाय बळकट करतात. सेतूबंधा सारखे काही व्यायाम योनिमार्गाच्या मुखाजवळचे स्नायू लवचिक करून सुलभ प्रसूतीला मदत करतात. पाय हा तर शरीराचा पायाच. तो कणखर केल्यास गर्भिणीस या अवस्थेत वाढलेले वजन पेलण्यास मदत होते. यासाठी ताडासन, त्रिकोणासन, वीरभद्रासन, उभे राहून करायची अशी आसने उपयुक्त आहेत. प्राणायाम, ध्यानधारणा व शवासन यामुळे रक्तदाब (ब्लड प्रेशर) नियंत्रित होते व मन प्रसन्न राहते.

Health Tips | वैयक्तिक आरोग्याविषयी सूचनाPregnancy Tips

तुमचे कपडे शक्यतो सुती वापरा. घट्ट कपडे घालणे टाळावे. काही खिया पोट दिसू नये म्हणून परकर व साडी घट्ट आवळून बांधतात हे पूर्ण चुकीचे आहे. आतील कपडे सुती व ढिले असू द्या. चांगल्या सुती ब्रेसिअर्स स्तनांना आधार देण्यासाठी वापरा.

आंघोळ नियमितपणे करा. आंघोळीच्या वेळेस सर्व शरीराबरोबर स्तनाग्रांची जास्त स्वच्छता ठेवा. स्तनाग्रे बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. किंचित खोबरेल तेलाने चोळल्यास ती मऊ राहतील.

How to sleep during pregnancy | विश्रांती काम – Pregnancy Tips

घरातील सर्व कामे तुम्ही गर्भारपणातील काळात करू शकता. मात्र जास्त दमणूक टाळा.

दुपारी १ ते १॥ तास विश्रांती घ्या.

शेवटच्या ३ ते ४ महिन्यात दुपारी डाव्या कुशीवर झोपणे चांगले. जास्त वेळ उभे राहणे टाळा. त्यामुळे पायावर सूज येऊ शकते. रात्रीची झोप ८ ते १० तास होणे आवश्यक. पायावर सूज वाटल्यास पोटरीखाली उशी घेऊन झोपणे चांगले. जड वजन उचलणे टाळा.

Sex in Pregnancy 1st trimester | शरीर संबंध

पहिल्या ३ महिन्यात व शेवटच्या महिन्यात शरीरसंबंध टाळणे चांगले. पोटावर जास्त दाब येणे टाळावे. रक्तस्त्राव होत असल्यास शरीरसंबंध पूर्ण बंद ठेवणे हितकारक.

प्रवास

खूप लांबचा व सलग जास्त वेळेचा प्रवास टाळावा. प्रवासात हादरे कमीत कमी बसावेत. प्रवास करावयाचाच झाल्यास रेल्वेचा प्रवास जास्त सुरक्षित. सहाव्या महिन्यानंतर विमान प्रवासाला परवानगी मिळत नाही.

White Discharge during pregnancy | पांढरा स्त्राव

१. गर्भारपणात सर्वच स्त्रियात हा स्त्राव जास्त प्रमाणात होतो. मात्र हा आजार नव्हे, तर योनिमार्गातील बदलाचा परिणाम आहे त्यासाठी औषधांची जरुरी नाही. मात्र या खावाबरोबर आतील अंगाला खाज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

२. गर्भारपणात शेवटच्या एकदोन महिन्यात पांढरे पाण्यासारखे जात असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

व्हेरीकोज व्हेन्स– Pregnancy Tips

म्हणजे पायावर टम्म फुगलेल्या निळ्या शिरांचे जाळे खूप स्त्रियांच्या पायावर दिसते. अशावेळी पायाखाली उशी घेणे श्रेयस्कर ठरेल.

Baby Move | गर्भाची हालचाल – Pregnancy Tips

५ महिने पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या पोटात गर्भाची हालचाल जाणवू लागेल. तिच्यावर पूर्ण लक्ष ठेवा. रोज सकाळी उठल्याबरोबर ५ ते १० मनिटे स्वतःच्या पोटातील बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवणे चांगले.

अगदी शेवटच्या महिन्यात बाळाची हालचाल थोडी मंदावते. परंतु साधारण १० मिनिटात २ ते ३ वेळा नक्कीच जाणवली पाहिजे. हालचाल यापेक्षा कमी वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सूचना– Pregnancy Tips

१. शेवटच्या महिन्यात दवाखान्यात न्यायच्या सामानाची बॅग तयार ठेवा. २. जाताना दागिने घरीच ठेवून जा.

३. कळा, रक्तस्त्राव किंवा पाणी जाणे यापैकी कोणताही त्रास झाल्यास दवाखान्यात जा. ही बाळंतपणाची सुरूवात असू शकते.

४. बाळंतपणाच्या कळा सुरु झाल्यानंतर दवाखान्यात जाताना शक्यतो जेवण करणे टाळा. चहा, कॉफी सारखे द्रव पदार्थ घेऊनच प्रसूतिगृहात जा.

विशेष सूचना :- Pregnancy Tips

१. पायावर तोंडावर सूज आल्यास,

२. सारखे डोके दुखू लागल्यास,

३. दृष्टी मंद वाटू लागल्यास ४. लघवी कमी होऊ लागल्यास

५. डोहाळे जास्त लागल्यास

६. झोप येत नसल्यास

७. झटके येत असल्यास

८. रक्तस्त्राव अथवा पाणी जाणे सुरू झाल्यास

नेहमीपेक्षा कोणत्याही तऱ्हेने कमी जास्त वाटू लागल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्रसूती ही स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना आहे. त्या विषयी आधीपासून तुम्ही माहिती करून घेणे जरूरीचे आहे. निसर्ग आधीपासूनच प्रसूतीसाठी शरीराची तयारी करून घेत असतो.

तरीही एक लक्षात घ्या की बाळंतपणाच्या कळा स्त्रीला सहन करायला लागणारच. तुम्ही या काळात डॉक्टरांना जितके सहकार्य कराल तितकी प्रसूती सुलभ होण्यास व लवकर होण्यास सहाय्यक ठरणार आहे. सिझेरिअनचा निर्णय डॉक्टरांनी घेतल्यास तो का घ्यावा लागतो आहे हे डॉक्टरांकडून समजावून घ्या.

बाळासाठी सूचना :-

१. कमीतकमी एक महिना बाळाला येणाऱ्या जाणाऱ्याच्या हातात देऊ नका.

२. बाळाला कमीत कमी हाताळा.

३. बाळाच्या चेहऱ्याजवळ आपला चेहरा नेऊ नका.

४. बाळाला केवळ आईचे दूध द्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इतर काही देऊ नका.

५. बाळाला अंगावरचे दूध चालू असेपर्यंत वेगळे पाणी पाजण्याची अजिबात गरज नाही.

६. बाळाला गुटी किंवा ग्राईप वॉटर देऊ नका.

७. बालरोग तज्ञाच्या सल्ल्याशिवाय बाळाला कोणतेही औषध किंवा टॉनिक देऊ नका.

८. दूध किंवा कोणताही पातळ पदार्थ वाटी चमच्याने द्या.बाटली कधीही वापरू नका.

९. बाळाच्या कानात, नाकात किंवा शी, शूच्या जागी तेल घालू नका.

१०. डोक्याला व अंगाला मसाजसाठी शुद्ध खोबरेल तेल वापरा.

११. डोळ्यात काजळ घालू नका.

१२. वेळच्या वेळी लसीकरण करणे गरजेचे आहे.

गर्भवती महिलांचा आहार कसा असावा?

Related Posts

2 thoughts on “गर्भवती स्त्रियांना महत्त्वाचे मार्गदर्शन | Pregnancy Tips In Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *