Introspection In Marathi | जाणून घ्या आत्मनिरीक्षण म्हणजे काय?

What Is Self Introspection? | आत्मनिरीक्षण म्हणजे काय?

Introspection In Marathi : एक घडलेली घटना आहे. एक चांगल्या स्वभावाचा डॉक्टर होता, त्याची प्रॅक्टिसही चांगली होती. तो एक दिवस मला म्हणाला, ‘शास्त्रीजी! ह्या टांगेवाल्यासारखी हरामी माणसे दुसरी कोणी नसतील.’ असें म्हणून त्याने त्याचा टांगेवाल्यावरचा स्वतःचा राग बोलून दाखवला.

Introspection In Marathi

‘टांगेवाल्यांनी तुमचें काय बिघडवलें आहे कीं तुम्ही त्यांच्याविरुद्ध एवढा रागावला आहात?’ मी विचारलें.

तो म्हणाला, ‘मी आणि माझी पत्नी बाहेरगावी जाण्यासाठीं टांग्यामध्ये बसलो. टांगेवाला हळूहळू टांगा चालवत होता. तेव्हा माझी पत्नी मला म्हणाली, ‘आपल्याला ९-२५ ची गाडी पकडायची आहे आणि टांगा जर असा चालला तर आपण पोहोचू शकणार कां?’ टांगेवाल्याने आमचें बोलणें ऐकलें आणि तो टांगा आणखी हळू चालवू लागला. तेव्हा मला त्याला सांगावें लागलें, ‘आम्हाला गाडी पकडायची आहे. मी तुला आठ आणे जास्त देईन पण तू गाडी वेगाने चालव.’ इतकें ऐकताच त्याने घोड्याला दोन चाबूक मारले आणि घोडा वेगाने धावू लागला. अखेर आम्ही वेळेवर व्ही. टी. स्टेशनवर पोहोचलो. टांगेवाल्याने पाहिलें कीं आम्हाला जायची घाई आहे आणि टांगा तर हळू चालवला अधिक पैसे मिळतील. हे व्हिक्टोरियावाले फार हरामी आहेत. ‘

डॉक्टरने त्याचा राग व्यक्त केल्यावर मी त्याला विचारलें, ‘डॉक्टरसाहेब! तुम्हाला व्हिजिटसाठीं बाहेरगावाहून रात्री कोणी बोलवायला आला तर तुम्ही पन्नास रुपये अधिक घेता की नाहीं? (त्याकाळी व्हिजिट चार्ज कमी होता.) दुसऱ्याची अडचण ही माझी कमावण्याची संधि, ही भांडवलवादी विचारसरणी जशी त्या टांगेवाल्याची होती तशीच तुमची देखील आहे की नाहीं? मग त्या टांगेवाल्याला हरामी म्हणण्याचें काय कारण?’ आपण दुसऱ्याचे दोष पहातो परंतु आत्मनिरीक्षणाच्या अभावामुळें आपल्याला आपले दोष दिसत नाहीत.

Introspection In Marathi मी एका गांवी गेलो होतो. तिकडे वकील महाशय भेटले. फार सज्जन एक व्यक्ति. ते म्हणाले, ‘राष्ट्रीय सभेचें तंत्र फार बिघडून गेलें आहे.’ कारण विचारता ते म्हणाले, ‘काळा बाजार करणारा व्यापारी आमच्या गांवच्या सत्ताधारी पक्षाचा प्रमुख आहे. काय हो! हें तंत्र असेंच चालणार का?’ तेव्हा मी त्यांना विचारलें, ‘तुम्ही खोट्या केसेस, खोट्या ब्रीफ घेता ना? पन्नास टक्के वकील नेहमीच खोट्या पक्षाचेच असतात ना? कोर्टात जी केस दाखल होते त्यात एक सच्चा असतो व दुसरा खोटा असतो आणि केस चालते तेव्हा वकील असणें आवश्यक असतें. तेव्हा त्याप्रमाणे एका पक्षाला वकील सच्चा आणि दुसऱ्या पक्षाला वकील खोटा असणारच. ‘

‘शास्त्रीजी! तुमचें म्हणणें खरें आहे. पण ही तर आमची प्रोफेशनल मोरॅलिटी मानली जाते.’ ‘तर मग तुम्ही म्हणता त्या व्यापाऱ्याची काळ्याबाजाराची नीति ही त्याची व्यापारी नीतिमत्ता का गणली जाऊ नये. तुम्ही त्याला तुमच्या शब्दात व्यावसायिक नीतिमत्ता (professional morality) गणता. थोडक्यात, धंद्यात किंवा जीवनात आपल्यात वैयक्तिक आत्मनिरीक्षणाचा अभाव आहे. त्यामुळे एकमेकांचे दोष पाहून, परस्परांमध्ये दोषांची भित उभी करून आपण समाजाचा सत्यानाश करत आहोत.’

जर समाजात सुख, शांति व समाधान आणायचे असेल तर आत्मकेंद्रितता टाकून समाजात प्रभुनिष्ठा आणावी लागेल आणि दुसऱ्याचे दोष पहाण्याऐवजी आत्मनिरीक्षण करावें लागेल.

व्यक्तीचा आध्यात्मिक विकास साधला पाहिजे आणि समाजाचा सांस्कृतिक विकास झाला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी स्वाध्यायाशिवाय शक्य नाहीत. म्हणून उपनिषदाने त्याचा आग्रह धरून म्हटले आहे.

स्वाध्यायप्रवचनाभ्याम् प्रमदितव्यम्

देवपितृकार्याभ्याम् प्रमदितव्यम्।

Introspection In Marathi गुरु शिष्याला सांगतात, ‘तू आता गृहस्थाश्रमात प्रवेश करतो आहेस, तेव्हा एक गोष्ट तर नक्की आहे की तू तुझ्या परिवाराच्या निर्वाहासाठी कष्ट करणारच. चिमणी कधी शिकायला गेली नव्हती पण ती देखील आपल्या पिलाचे संगोपन | करते आणि तू तर माणूस आहेस. त् उत्कृष्ट धंदा करून पैसे कमव है सांगण्याची आवश्यकता नाहीं. कुशलान प्रमदितव्यम्। भूत्यै न प्रमदितव्यम्। परंतु तू मनुष्याचा जन्म घेऊन जन्माला आला आहेस म्हणून तुझ्यावर एक देवकार्य आणि दुसरें पितृकार्य अशी दोन कार्य पुरी करण्याची जबाबदारी आहे. त्याच्यात तू आळस करू नकोस.’

जीवनाच्या शेवटी एक दिवस आपल्याला प्रभूला हिशोब द्यावा लागेल. आपल्या सर्वांना भगवंताने चांगली परिस्थिति दिली, चांगली बुद्धि दिली तर मग समाजात ईश्वरनिष्ठा वाढवण्यासाठी आपण काय केलें? ईश्वरनिष्ठा वाढवण्यासाठी आपली किती शक्ति वापरली? आपण

आणखी वाचा: Shakuntala Story | शकुंतला आणि राजा दुष्यंत यांची प्रेमकथा

Self Introspection Meaning ? |आत्मनिरीक्षण म्हणजे काय ?

Introspection In Marathi भाकरीसाठी किंवा साडेसाती आहे या वहिमामुळे माणूस जपतप करतो ती कांहीं ईश्वरनिष्ठा नव्हे. ईश्वरनिष्ठा म्हणजे सारे काही प्रभूच चालवत आहे असा दृढविश्वास बसणें. ज्या जगात मी रहातो त्या जगात जन्म घेऊन मी माझ्या जीवनात अणि इतरांच्या जीवनात ईश्वरनिष्ठा किती वाढवली त्याचा विचार केला पाहिजे.

देवकार्य म्हणजे काय?

Introspection In Marathi देवकार्य म्हणजे जगदंबेचें स्मरण करायचें, भगवंताला काय हवें त्याचा विचार करायचा, त्याचें काम करायचे. तेव्हा सहज प्रश्न पडतो की भगवंत तर स्वतः समर्थ आहे, आपण त्याचे काय काम करणार? असा विचार मनात येणें हें सुद्धा स्वाभाविक आहे. परंतु बाप जेव्हा काम करतो तेव्हा त्याचा पांच वर्षांचा मुलगा बापाच्या जवळ उभा राहिला तरी तेव्हा देखील बापाला केवढा आनंद होतो! बापाला ठाऊकच आहे कीं हा बाळ कांहीं करू शकणार नाहीं. परंतु जेव्हा सगळे ईश्वराला विसरले आहेत, (अर्थात त्यांना स्वार्थ साधायचा असेल तेव्हा ईश्वराची आठवण येते आणि स्वार्थ साधताच विसरून जातात) तेव्हा बापाला, जगदंबेला वाटतें कीं हा मुलगा मला विसरला नाहीं. हें जाणून त्याला किती आनंद होत असेल.

आज एक अशी भ्रांत समजूत सर्वांच्यात घर करून बसली आहे कीं आपल्या भौतिक गरजा पुन्या करण्यासाठी ईश्वराला आठवायचे. स्वाभाविकपणे या गरजा पुऱ्या होताच माणसाची ईश्वरनिष्ठा कमी होत जाते. जगदंबा नेहमी माझ्या सन्मुख आहे. तिला, प्रभूला विसरायचें नाहीं आणि अख्खें जग तिला विसरायला लागलें असेल, प्रभूपासून पराङ्मुख होत असेल, तेव्हा त्याला प्रभुसन्मुख, मातेसन्मुख आणणें हें देवकार्य आहे.

आज तरुण पिढी प्रभूपासून दूर जात आहे. ह्याच्या मागचें मुख्य कारण असे असू शकेल कीं एखादी व्यक्ति कॉलेजमध्ये येऊन सांगत असेल, ‘भगवंताची अशी काय गरज आहे? मी भगवंताला कुठे मानतो? तरीही माझी भाकरी पचते ना?’ असें बोलणें हें टी. बी. च्या जंतूंसारखें आहे आणि कोवळ्या मनावर त्याचा विपरीत परिणाम झटकन होतो.

माझ्या शेजारी एखादा पहिलवान बसला असेल तर मी कांहीं पहिलवान होत नाहीं. पण बाजूला क्षयाचा रोगी बसला तर पटकन त्याचा संसर्ग होतो. असेच कांहींसें या असत् विचारांचें आहे. ते साथीच्या रोगाच्या जंतूंसारखे आहेत आणि त्यांचा फैलाव व्हायला वेळ लागत नाहीं. आपले दुर्दैव आहे कीं विश्वविद्यालयात नवीन पिढीच्या तरुणांसमोर अशी भाषा बोलून त्यांना भगवंतापासून दूर करण्यात येते. अशा, प्रभूपासून अलग पडलेल्यांना प्रभुसन्मुख करणें, जगदंबेला विसरलेल्या, त्याच्यापासून पराङ्मुख झालेल्या अशा तरुण पिढीच्या मनात निर्माण झालेला असत् विचाराचा ठसा पुसून टाकून त्यांना प्रभुसन्मुख करणें हैं देवकार्य आहे. सर्व जग सत्य, शिव अणि सुंदर रहावें ही भगवंताची इच्छा आहे. तुम्हीच विचार करून पहा की प्रत्येक बालक जन्माला येते तेव्हा ते सत्य, शिव व सुंदर असतें. परंतु त्याला आपला संसर्ग दोष लागला की त्याच्यात बिघाड सुरू होतो.

सत्य म्हणजे काय ?

Introspection In Marathi सत्य म्हणजे प्रामाणिकता, समाजातून प्रामाणिकता खलास झाली आणि समाज अप्रामाणिक बनत गेला तर जगाचा सत्यानाश होईल. नैतिक मूल्यांचा -हास व्हायला वेळ लागत नाहीं. नैतिक मूल्ये केवळ पुस्तकातच न ठेवता जीवनात उतरवली पाहिजेत. लायब्ररीच्या पुस्तकात सांभाळून ठेवून ती मूल्ये कधी टिकणार नाहीत. माणूस अप्रामाणिक बनत चालला आहे त्यामुळें त्याचा नैसर्गिक कल लुच्चेपणाकडे असतो. सज्जनतेने माणूस जगू शकत नाहीं असें माणसाला वाटू लागलें आहे.

सत्यमेव जयते नानृतं असें व्रत घेऊन बसलेल्या लोकांचा देखील सत्यावर विश्वास डगमगतो आहे. आणि अप्रामाणिकतेवर विश्वास वाढत जातो आहे. आजच्या लोकमानसाचा अभ्यास करण्यासारखा आहे. पण सर्व गोष्टी मानसशास्त्राच्या (psychology) पुस्तकात मिळत नाहीत. तुम्ही समाजात प्रत्यक्ष फिरा, तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि लोकमानसात काय आहे तें लक्षात येईल.

तुम्ही एखाद्याच्या घरी गेला आणि कुटुंबासोबत बसला कीं, घरातली गृहिणी तिच्या मुलांचें वर्णन करताना म्हणते, ‘शास्त्रीजी! हा मोठा आहे तो ठीक आहे. अतिशय भोळा सांब आहे. पण हा छोटा आहे ना, तो एवढा लुच्चा आहे आईबापाच्या हें बोलत असताना चेहऱ्यावरचें स्मित पहाण्यासारखें असतें.

त्यांना वाटत असतें ह्या धाकट्या मुलाला जन्म देऊन ते कृतकृत्य झाले! त्यांना वाटतें कीं ज्याला लुच्चेपणाने रहायला येतें तोच ह्या जगात जगू शकतो. लोकमानस कसें आहे त्याचें हें एक सहज उदाहरण आहे. लोकांना वाटतें कीं सुखी होऊन जगायचे असेल तर माणसाने अप्रामाणिक व्हायलाच हवें. इतक्या पातळीपर्यंत समाजात अप्रामाणिकता वाढली आहे, समाजातून सत्य निघून गेलें आहे.

याचप्रमाणे समाजातून शिव देखील गेलें आहे. शिव म्हणजे कल्याण. आपल्या जीवनात पशुत्वाने ठाण मांडलें असेल तर आपण अशिव झालो, झालो. अशुभ जीवनात देवत्व व पशुत्व अशा दोन गोष्टी आहेत. पशुत्व अशुभ आहे. ह्याचा अर्थ असा नव्हे कीं पशु अशुभ आहे. पशु पूजनीय असू शकतो. आपण गाईचें पूजन करतोच ना! परंतु माणूस जर बैल झाला, बैलासारखेंच जीवन जगू लागला तर त्याला फटकारलेंच पाहिजे.

आहारनिद्राभयमैथुनं च सामान्यमेतत्पशुभिर्नराणाम् । धर्मो हि तेषामधिको विशेष: धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ।।

अर्थ : आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे पशु व माणसात समान आहेत, पण माणसाने धर्माप्रमाणे आचरण केलें तर तें त्याच्यात विशेष आहे. धर्माचें आचरण करत नसेल तो पशुतुल्यच होय.
कांहींच्या मनात विचार येतो आणि ते विचारतात देखील, ‘शास्त्रीजी! आम्ही माणसे आहोत, व्यवस्थित रहातो, आम्हाला अक्कल आहे, आम्ही विचारपूर्वक सर्व व्यवहार करतो तर आमची पशु म्हणून गणना कशी काय होईल?’
असे विचारणाऱ्यांना विचारलें पाहिजे, ‘तुम्ही आहार, निद्रा, भय व मैथुन याशिवाय जीवनात कोणता मोठा वाघ मारला आहात? तुम्ही लहान होता, मोठे झालात, पैसा कमावला, मुलांसाठी तो जपून ठेवला. समाजाने तुमचा गळा पकडू नये, तुमचें नांव व्हावें म्हणून थोडा पैसा समाजाच्या तोंडावर फेकला आणि स्वतः ला कृतकृत्य मानू लागलात.

पुन्हा पुन्हा स्मरण करावें असें एक इंग्रजीत बालगीत आहे :

Solomon Grandy born on Monday, Christened on Tuesday,
Married on Wednesday, Sickened on Thursday,
worsened on Friday, Died on Saturday,
Berried on Sunday; This is the end of Solomon Grandy.

वरील बालगीत चा अर्थ: सॉलोमन ग्रॅन्डी सोमवारी जन्मला, मंगळवारी त्याचा नामकरण विधि झाला, त्याने जानवें घेतलें, बुधवारी लग्न झालें, गुरुवारी आजारी पडला, शुक्रवारी अत्यवस्थ झाला, शनिवारी मेला, रविवारी त्याला पुरलें.

आणखी वाचा: Exercise In Marathi | जाणून घ्या व्यायामाचे महत्त्व

Introspection In Marathi  माणूस संपूर्ण जीवनभर असेंच जगला असेल तर त्याने जीवनात दुसरें काय केलें ?  हेंच पशुतुल्य जीवन होय. असें पशुतुल्य जीवन जगणारा माणूस अशुभ आहे. ज्या काळात बहुतांश माणसे असे जीवन जगत असतात त्या काळाला कलियुग म्हणतात. माणसाच्या जीवनात पशुत्वाच्या ऐवजी देवत्व आलें तर जीवन शिव झाले असे मानलें जातें.

जीवनात जसें शिवत्व आलें पाहिजे तसे जीवनात सौंदर्य देखील असलें पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची सौंदर्याची जाण वेगवेगळी असतें. परंतु, जीवनाच्या सौंदर्याची गोष्ट वेगळीच आहे. पतंजलि, वाल्मीकि इत्यादि ऋषिमुनी सुंदर होते. हजारो वर्षांनंतर आज देखील त्यांच्या जीवनाचें सौंदर्य सगळ्यांचें मन आकर्षून घेते. जीवनाची सुंदरता ‘मेकअप’ करून येत नाहीं. त्याचें सौंदर्य त्यांच्या कृतज्ञतेत होते. भगवंताने केलेले उपकार तसेच समाजाने किंवा आई – वडिलांनी केलेले उपकार ते कधीही विसरले नाहीत.

ऋषींनी किती महान कार्य केलें आहे. त्यांनी उपनिषदासारखें वाङ्मय आपल्याला दिलें. ही गोष्ट नमस्कारार्ह आहे. परंतु ऋर्षीचें हें वाङ्मय कोणाला अभ्यासायची इच्छा नाहीं. शिक्षणात सर्व विषय शिकवले जातात, परंतु वैदिक वाङ्मय जें इतकें श्रेष्ठ आहे, त्याला आजच्या शिक्षणात स्थान नाहीं. त्याचें कारण हैं कीं तें संस्कृतात आहे आणि संस्कृत ही मृतप्राय भाषा (dead language) झालेली मानली जाते.

ऋषींनी आपल्यासाठी घेतलेले श्रम आपण विसरून गेलो. आपल्याला असेच वाटू लागलें आहे कीं आपणच शहाणे आहोत. भगवंत आपल्यावर उपकार करतो, आपल्याला सांभाळतो, न मागता सर्व देतो, त्याच्यामुळे तर आपले अस्तित्व आहे. तरीही ‘भगवान कोण आहे?’ असें विचारायची माणसाला शरम देखील वाटत नाहीं. ‘जी शक्ति अव्यक्त आहे, जिला आम्ही पाहू शकत नाहीं. तिची आम्हाला काय गरज?’ असें म्हणणाऱ्या लोकांच्या जीवनातून कृतज्ञताच निघून गेली आहे, ते लोक विसरून जातात कीं ते जें जेवतात, खातात तें भगवान पचवतो. जेवताना भगवंताला नमस्कार करण्याचें सामान्य सौजन्य देखील त्यांच्यात नाहीं. ज्या ठिकाणी बहुतांश लोक असे असतील, तिथे सौंदर्य कुठून निर्माण होणार?

कृतज्ञतेत सौंदर्य आहे ही गोष्ट हे लोक विसरून जातात. वाल्मीकींकडे प्रखर बुद्धिमत्ता (intellectual height) होती की नाहीं हें कोणास ठाऊक? परंतु त्यांच्या जीवनात सौंदर्य होतें. म्हणूनतर त्यांचें लिखाण सरळ व प्रासादिक आहे.

रामेति मधुरां वाणीं विक्षामित्रोऽभ्यभाषत। उत्तिष्ठ नरशार्दूल पूर्वासंध्या प्रवर्तते।।

रामप्रहरी रामाला उठवताना बोललेल्या ह्या श्लोकात केवढे माधुर्य आहे!

Introspection In Marathi प्रखर बुद्धीची पुष्कळ माणसे जन्माला येतात. भगवंत त्यांना ती बुद्धि वापरण्याची संधि देतो, पण त्यांनी ती वापरली नाहीं तर पुढच्या जन्मात ती काढून देखील घेतो. वाल्मीकींच्या जीवनाची उंचीच वेगळी होती कीं ज्यामुळे त्यांच्या जीवनात सौंदर्य निर्माण झालें होतें. थोडक्यात, जगात सत्यं शिवं सुंदरम् निर्माण करण्याचें कार्य करणें हें खऱ्या अर्थाने प्रभुकार्य मानलें जातें.

Related Posts

One thought on “Introspection In Marathi | जाणून घ्या आत्मनिरीक्षण म्हणजे काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *