अग्निपथ योजना म्हणजे काय ? (What is Agneepath Yojana?)
Agneepath Yojana म्हणजे आपल्या देशामधील बेरोजगार तरुण लोकांना रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने भारत सरकार नेहमी अनेक प्रकारच्या योजना राबवते. तरुण लोकांना रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून भारत सरकारने हि अग्निपथ योजना २०२२ नवीन योजना सुरु केली आहे. आणि या योजने बद्दलची घोषणा देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. या अग्निपथ योजने नुसार सैन्य भरती मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तरुण लोकांना सैन्यात प्रवेश देण्यात येणार आहे. अग्निपथ योजनेनुसार, भारतीय सशस्त्र दलात दरवर्षी ४६,००० सैनिकांची भरती केली जाईल . या योजनेसाठी 21 वर्षे ते 23 वर्षे वयोगटातील लोक पात्र आहेत आणि ज्यांची या योजनेसाठी निवड केली जाईल त्यांना अग्निवीर म्हणून ओळखले जाईल.
या अग्निपथ योजनेमधून ४ वर्ष कालावधी साठी तरुण लोकांना सैन्यामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. ४ वर्षानंतर या तरुणांचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यापैकी २५% तरुणांना कायम निवडले जाणार आहे आणि ७५% लोकांना सेवा निवृत्त केले जाईल . या अग्निपथ योजने मधून लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सैन्यामध्ये भरती केले जाणार आहे.
अग्निपथ योजना वेतनमान (Agneepath Scheme Pay Scale)
Agneepath Yojana या अग्निपथ योजने मध्ये आलेल्या तरुण लोकांना मासिक पगारासह इतर अनेक फायदेही दिले जातील. ग्निपथ योजने मधून अग्निवीरांना दिले जाणारे वेतन खालीलप्रमाणे आहे.
- अग्निविराला पहिल्या वर्षी सुमारे 4.76 लाख रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे.
- पहिल्या वर्षी,अग्निविराला दरमहा सुमारे ₹30,000 पगार मिळेल.
- चौथ्या वर्षी सुमारे ६.९२ लाख रुपयांची वाढ करण्यात येईल.
- आणि चौथ्या वर्षापर्यंत, ते दरमहा ₹50,000 पर्यंत वाढवले जाईल.
4 वर्षांनंतर सैनिक जेव्हा त्यांची पोस्ट सोडतील तेव्हा त्यांना सरकारच्या सेवा निधी योजनेतून ₹1.1 दशलक्ष एकरकमी रक्कम दिली जाईल आणि ती रक्कम करमुक्त असेल.
आणखी वाचा: Intraday Trading In Marathi | जाणून घ्या इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय आणि कसे करावे
अग्निपथ योजनेची निवड प्रक्रिया (Selection Process of Agneepath Scheme)
Agneepath Yojana अग्निपथ योजनेची निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:
ज्या तरुण लोकांना या योजनेमधून लाभ घ्यायचा आहे, त्यांना “अग्निपथ योजना फॉर्म PDF” भरून या योजनेमध्ये अर्ज करावा लागेल. तरुण लोकांची निवड कठोर प्रक्रियेने केली जाणार आहे. तरुणांच्या कामगिरीच्या आधारे निवडण्यात येणार आहे. अग्निवीरा ला प्रशिक्षण (ट्रिंनिंग) केंद्रांवर कठोर प्रशिक्षण दिले जाणार आहे. भरती प्रक्रियेत कोणतेही बदल केले जाणार नाहीत.
अग्निपथ योजनेसाठी शैक्षणिक पात्रता (Qualification for Agneepath Scheme)
Agneepath Yojana जे तरुण लोक या योजने साठी पात्र आहेत तेच तरुण अग्निवीर होऊ शकतात. अग्निपथ योजनेसाठी अर्ज करायची पात्रता खालीलप्रमाणे आहे:
- अर्ज करणारी तरुण व्यक्ती भारताची कायमस्वरूपी रहिवासी असावि .
- अर्ज करणारा व्यक्ती किमान १० वी किंवा १२ वी पास असावा.
- अर्जदाराला आरोग्याशी संबंधित सर्व पात्रता पूर्ण कराव्या लागतील.
- अर्जदाराचे वय 17.5 ते 21 वर्षे दरम्यान असावे.
- यासाठी योजनेसाठी महिला तरुण आणि पुरुष तरुण दोघेही अर्ज करू शकतात.
आणखी वाचा: ChatGPT In Marathi | जाणून घ्या चाटजीपीटी म्हणजे काय ते कसे वापरावे आणि त्याचे फायदे
अग्निपथ योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये (Advantages and Features of Agneepath Scheme)
Agneepath Yojana आपल्या देशातील तरुण लोकांनी सैन्यात भरती व्हावे म्हणून आपल्या देशाच्या केंद्रीय गृहमंत्रालयाने ही योजना सुरू केली आहे. या योजने चे फायदे आणि वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- या योजने मध्ये सहभागी होणाऱ्या तरुण लोंकाना अग्निवीर म्हटले जाणार आहे.
- या योजने मध्ये अग्निवीरांचा कालावधी हा ४ वर्षांचा असेल आणि त्यानंतर त्यांना दिलासा मिळेल.
- यापैकी 25% अग्निवीरांना कायम (पर्मनंट) करण्यात येणार आहे.
- या अग्निपथ योजनेमधून तिन्ही सैन्यात तरुण मुलांची भरती केली जाणार आहे.
- या योजनेमध्ये अग्निवीरांना ४८ लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण दिले जाईल.
- या योजनेमध्ये पाणी, जमीन, हवा अशा सर्व ठिकाणी तरुणांना सेवा करण्याची संधी दिली जाईल.
- या योजनेमध्ये सेवेत असताना अग्निवीरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत केली जाईल.
- या योजनेमध्ये अग्निवीरांना सध्याच्या प्रशिक्षण केंद्रांवर कठोर लष्करी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- या योजनेमध्ये अग्निवीर दरवर्षी ३० दिवसांची रजा घेऊ शकतो.
- तुम्ही या अग्निपथ योजनेच्या वेबसाइट mod.gov.in वरून अग्निपथ योजना फॉर्म डाउनलोड करून या योजनेसाठी अर्ज करू शकता.
- या अग्निपथ योजनेमध्ये 4 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सर्व अग्निवीरांना सेवानिधीचा हक्क मिळेल.
- या योजनेमध्ये अग्निवीरांना कायम झाल्यावर नियमित शिपाई तत्वावर पगार दिला जाईल.
- या योजनेमध्ये महिला सुद्धा अर्ज करू शकतात.
Agneepath Yojana या अग्नीपथ योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:
- शिक्षणाचा पुरावा
- निवास प्रमाण
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक खाते विवरण
- वैद्यकीय प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- वयाचा पुरावा
- मोबाईल नंबर, तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक करणे आवश्यक आहे
आणखी वाचा: अग्निपथ योजना ऑनलाइन अर्ज कसा करावा, नोंदणी, निवड प्रक्रिया, पात्रता,